Pune: शहरातील दुकानांसाठी आठवडाभराचे वेळापत्रक जाहीर, लक्षात ठेवा कोणत्या दिवशी… काय मिळणार?

Pune: Municipal Corporation announces weekly schedule for shops, what will be available on which day?

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणू संक्रमणशील अशा शहरातील 65 प्रतिबंधित क्षेत्रांच्या बाहेर महापालिकेने काही अटींवर दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शहरातील रस्त्यांवर तसेच दुकानांमध्ये गर्दी होऊ नये, यासाठी पुणे महानगरपालिकेने विविध वस्तूंच्या विक्रीसाठी वेगवेगळे वार ठरवून दिले आहे. पुणेकरांना आता कोणत्या वारी कोणत्या वस्तू मिळणार याचे वेळापत्रकच महानगरपालिकेने जाहीर केले आहे. दुकानदारांसाठी व ग्राहकांसाठी देखील महापालिकेने काही अटी-शर्ती घालून दिल्या आहेत. 

एकाच वेळी सर्व दुकाने उघडी राहिल्यास खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या पुणेकरांची रस्त्यांवर आणि दुकानांमध्ये गर्दी वाढू शकते. हे टाळण्यासाठी विशिष्ट दिवशी विशिष्ट वस्तूंची दुकाने उघडी राहणार आहेत. त्यासाठी कोणत्या वारी कोणत्या वस्तू उपलब्ध होणार याचे सविस्तर वेळापत्रकच महापालिकेच्या आदेशात देण्यात आले आहे. व्यापारी व ग्राहकांच्या माहितीसाठी आदेशातील संबंधित भाग आम्ही या ठिकाणी प्रसिद्ध करत आहोत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.