Pune: महापालिकेत ठेकेदार, नागरिकांना प्रवेश बंदी; सुरक्षा रक्षकांकडून कसून चौकशी

Pune: Municipal Corporation bans contractors, citizens; Thorough investigation by security guards

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर पुणे महापालिकेनेही सर्वसामान्य नागरिक आणि ठेकेदारांना प्रवेश बंद केला आहे. महापालिकेच्या गेटवरच सुरक्षा रक्षकांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महापालिकेत वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक उपाययोजना करण्याची विनंती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना केली होती. त्यानुसार आयुक्तांनी हे आदेश दिले आहेत.

महापालिका अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी, नगरसेवकांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत आहे. पुणे शहरातील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 13 हजारांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे दूरध्वनी, ई- मेल, व्हाट्सएपच्या माध्यमातून जास्तीत जास्त संपर्क करण्याचे आवाहन महापौरांनी केले आहे.

पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले असताना महापालिका सुद्धा हॉटस्पॉट ठरण्याची चिन्हे होती. त्याला महापौरांनी तातडीने आळा घालण्यासाठी आयुक्तांना विनंती केली आहे. त्यामुळे आता महापालिकेत बिनकामाच्या होणाऱ्या गर्दीला आळा बसला आहे.

महापालिकेत आता कधी नव्हे एवढी शांतता जाणवत आहे. सर्व कोरोनाचा परिणाम असून, उत्पन्नावरही परिणाम झाला आहे. या कालावधीत नगरसेवकांनीही प्रभागांतच काम करायला प्राधान्य दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.