Unauthorized cutting of trees: कांचनवृक्षाच्या अनधिकृत वृक्षतोडीवर पुणे महानगरपालिकेकडून निर्बंध

एमपीसी न्यूज : विजयादशमीनिमित्त मोठ्या प्रमाणावर कांचनवृक्षाच्या फांदीची पाने सोने म्हणून वापरली जातात. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर अनधिकृतपणे वृक्षतोड केली जाते.

दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर या वृक्षांची होणारी अनधिकृत वृक्षतोड टाळण्यासाठी त्यावर पाळत ठेवण्यात येणार आहे. तसे कृत्य करताना आढळल्यास महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जातं अधिनियम 1975 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल.

पुण्यामध्ये गुरुवारी ‘या’ ठिकाणी पाणीपुरवठा बंद असणार

असे कृत्य करताना कोणी आढळल्यास वृक्षप्रेमी, सामाजिक संस्था व नागरिकांनी क्षेत्रीय कार्यालयनिहाय उद्यान वृक्ष प्राधिकरण विभागाकडे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी पुणे मनपाच्या वेबसाइटवर क्रमांक देण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.