Pune: महापालिका, भारतीय जैन संघटना व फोर्स मोटर्सतर्फे ‘मिशन झिरो’चा प्रारंभ

नागरिकांच्या मनातील कोरोनाची अनाठायी भीती दूर करण्यासाठी पुढाकार

एमपीसी न्यूज – नागरिकांच्या मनातील कोरोनाची अनाठायी भिती दूर करण्यासाठी पुणे महानगरपालिका, भारतीय जैन संघटना, फोर्स मोटर्सने पुढाकार घेतला आहे.

पुणे महानगरपालिका, भारतीय जैन संघटना (बीजेएस) व फोर्स मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘मिशन झिरो’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते हिरवे झेंडे दाखवून या उपक्रमाचा लोकार्पण सोहळा पार पडला. नागरिकांच्या जास्तीत जास्त चाचण्या करणे, रॅपिड अ‍ॅक्शन प्लॅनद्वारे मोठ्या प्रमाणात ‘अर्ली डिटेक्शन’वर भर देणे हे या उपक्रमाचा उद्देश आहे. याप्रसंगी उपमहापौर सरस्वती शेंडगे, विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ, बीजेएस संस्थापक शांतीलाल मुथ्था, स्वीकृत नगरसेवक सुभाष जगताप व इतर मान्यवर उपस्थित होते. तर, पुणे शहरातील कोरोनाचे संकट कमी करण्यासाठी अनेक सामाजिक संघटनांनी महापालिकेला मदत केली होती. शहरात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढतेच आहेत. त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. भारतीय जैन संघटनेतर्फे सुरुवातीपासूनच महापालिकेला सहकार्य करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.