Pune news: पुणे पालिकेने  ५ रुपये दराने वाटली ४० हजार रोपे 

Pune Municipal Corporation distributed 40,000 saplings at the rate of Rs.5.

एमपीसी न्यूज- महापालिकेच्या उद्यान विभागाने अल्पदरात उपलब्ध करून दिलेल्या या वृक्षांच्या रोपांच्या खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील दहा दिवसांत तब्बल ४० हजार रोपे नागरिकांनी विकत घेतली आहेत.

पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत “वन महोत्सव” साजरा करण्यात येत असून या कार्यक्रमाद्वारे नागरिकांना जास्तीत जास्त वृक्ष लागवड करावी, हे उद्दीष्ट समोर ठेवून वन महोत्सव साजरा केला जात आहे. शहरातील उद्यान कार्यालय जंगली महाराज रोड , या ठिकाणी अल्प दरात वृक्ष रोपे उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

उद्यान विभागाने कांचन, मोह, करमळ, जांभूळ, आंबा, कडुलिंब, बदाम, चिंच, करंज, मोहगणी, रोहितक, देवदार, कैलासपती, कवठ, मुचकुंद पिंपळ, पुत्रवंती, रिठा, सीताअशोक, सुरू, ताम्हण, टेंभुर्णी, कोर्डिया, औदुंबर, अशोक, अर्जुन, आपटा, धावडा, हिरडा, काशीद, करवंद, भेंडी आणि बकान अशा देशी वृक्षांची रोपे अवघ्या पाच रुपयात नागरिकांना उपलब्ध करून दिली आहेत. एकूण ३६ प्रकारची रोपे ठेवण्यात आली आहेत.

ही झाडे पालिकेच्या हद्दीत अधिकाधिक लावली जावीत आणि त्यामधून पर्यावरणाचे रक्षण व्हावे असा हेतू असल्याचे उद्यान विभागाचे अधीक्षक अशोक घोरपडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.