Pune : महापालिकेचे कार्यकारी अभियंता जयंत सरवदे यांचे कोरोनामुळे निधन

Municipal Corporation Executive Engineer Jayant Sarvade passed away due to corona

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता जयंत सरवदे ( वय 51) यांचे कोरोनामुळे काल, गुरुवारी निधन झाले. एका चांगल्या अधिकाऱ्याचे कोरोनामुळे निधन झाल्याने महापालिके हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

जयंत सरवदे यांना 15 दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना मधुमेह व उच्च रक्तदाब असल्याने त्यांची प्रकृती खालावत गेली.

उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, 2 मुली, मुलगा, असा परिवार आहे.

कोरोनाच्या संकट काळात पुणे महापालिकेचे अधिकारी – कर्मचारी रात्रंदिवस जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. पुणे महापालिकेत आतापर्यंत 14 जणांचे कोरोनामुळे निधन झाले आहे.

शहरात रोज कोरोनाच्या 6 हजारांवर चाचण्या करण्यात येत आहेत. त्यामध्ये सातत्याने 1700 ते 1800 रुग्ण वाढत आहेत. आतापर्यंत या विषाणूमुळे 1 हजार 284 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाचे आता शहरात 53 हजार 437 रुग्ण झाले आहेत. मात्र, वाढत्या रुग्णांना बेडस मिळत नसल्याची ओरड सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.