PMC News : गणेश विसर्जनासाठी पुणे महापालिका सज्ज,15 क्षेत्रीय कार्यालयाची सर्व तयारी पूर्ण

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेची विसर्जनाची तयारी पूर्ण झाली असून 15 क्षेत्रीय कार्यालयाच्या 303 विसर्जन ठिकाणांवर प्रशासनाने यंत्रणा सज्ज केली आहे.अलका टॉकीज चौक, महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रोड, नारायण पेठ, माती गणपतीजवळ मंडप व स्टेज देखील महापालिकेने टाकले आहेत.

आरोग्य विभागाकडून सार्वजनिक ठिकाणी रुग्णवाहिका,वैद्यकीय पथके,फिरती शौचालये,सूचना फलक आदी गोष्टी सज्ज करण्यात आल्या आहेत.महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने डेक्कन जिमखाना, नुतन मराठी विद्यालयाजवळ, लक्ष्मी रस्ता या ठिकाणी मिरवणूक संपेपर्यंत स्वतंत्र वैद्यकीय अधिकारी, फार्मीस्ट, ऑक्झिलरी नर्स, ज्युनीअर नर्स, नर्सींग ऑर्डली व वाहन चालक यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. यावेळी मिरवणूकीत गुलालाचा वापर जपून करावा व रासायनिक रंगा एवजी नैसर्गिक रंगाची उधळण मिरवणूकीत करण्याचे आवाहन आरोग्य  विभागाकडून करण्यात आले आहे.

घाटांवर व मिरवणूक मार्गीकेवर औषध फवारणी करण्यात आली आहे.तसेच घाटावर जीवरक्षक पथक देखील तैनात करण्यात येणार आहे.तसेच अग्निशामक दलाच्यावतीने प्रत्येक घाटावर अग्निमन दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.तसेच यावेळी घाटावर,नदी किंवा तलाव येथे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांना जलाशयाच्या लांब ठेवावे.कोणी पाण्यात बुडत असेल तर त्वरीत तेथे उपस्थित असणाऱ्या जीव रक्षकाला याची कल्पना द्यावी. होडीतुन जाताना होडीच्या क्षमतेचा अंदाज घेऊनच त्यात बसावे,शक्यतो जीव रक्षकांकडून गणरायाच्या मुर्तीचे विसर्जन करावे, असे आवाहन अग्निशमन दलाने केले आहे.

तसेच आपत्कालीन वेळेसाठी पुढील संपर्क क्रमांक महापालिकेच्यावतीने जाहीर करण्यात आले आहेत.

1) 020 – 25501269,  2) 020 – 25506800,  3) 0202 – 25506801 4).020-25506802

5) 020 – 25506803

6) अग्निशमन दल -101

7) आपत्ती व्यवस्थापन अधिकारी – गणेश सोनुने – 9689931511

8) अग्निशमन प्रमुख देवेंद्र पोटफोडे – 8108077779

9) माहिती व जनसंपर्क अधिकारी योगेश हेंद्रे – 9922404099

या क्रमांकावर नागरिकांना मदतीसाठी संपर्क साधता येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.