PMC News : गणेशोत्सवासाठी पुणे महापालिका सज्ज, शहरात 303 ठिकाणी करता येणार गणेश विसर्जन

एमपीसी न्यूज – दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर अगदी उत्साहात यंदा पुणेकर गणेशोत्सव साजरा करणार आहेत. त्यामुळे महापालिका, अग्निशमन दल व पोलीस प्रशासन या गणेशोत्सवासाठी पूर्णपणे सज्ज झाले असून पुणे शहरात घाट, सार्वजनिक विसर्जन तलाव अशा एकूण 303 ठिकाणी मागरिकांना गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे.

महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयांनी त्यांच्या परिसरात स्वच्छता, ग्रुप स्विपींग, कंटेनर निर्माल्य कलश, किटकनाशक फवारणी, विसर्जन घाटांवर चोख व्यवस्था,घाटांवर औषध फवारणी, नदी किनाऱ्यावर, घाटांवर विसर्जन तलाव, लोखंडी टाक्यांची सोय अशा सुविधा बरोबरच जिवरक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून व सर्व ठिकाणी फिरते हौदांची व्यवस्था, सुरक्षा यंत्रणा, विद्युत जनित्र, द्वनीक्षेपक यंत्रणा, जलवाहिनी व मलवाहिन्या यांच्या दुरुस्ती देखील करण्यात आले आहेत.

स्वतंत्र कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करून आवश्यकतेनुसार मंडप बॅरीगेट्स उभारण्यात आलेले आहेत.सार्वजनिक स्वच्छता गृहे, शौचालयांची सुविधा, फिरती शौचालये व सुचना फलक यांचीही सुविधा करण्यात आली आहे.

तसेच विसर्जन घाटावर मुर्ती व निर्माल्य दानाचीही सुविधा करण्यात आली असून रोज दहा दिवस दोन पाळीमध्ये महापालिका सेवकांची स्वच्छतेसाठी नेमणूक करण्यात आली आहे. याबरोबरच महापालिकेच्या 24 अग्निशामक दले सतर्क ठेवण्यात आली असून नागरिकांना मदत लागल्यास ते 101 किंवा 02026451707 या क्रमांकावर फोनवर फोन करून मदत मागू शकतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.