Pune: चीनच्या भ्याड हल्ल्याचा निषेध करून महापालिकेची सभा तहकूब

Pune: Municipal Corporation meeting adjournment to protest China's cowardly attack आज घेण्यात आलेल्या सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांची उपस्थिती कमी होती. नगरसेवक आणि अधिकाऱ्यांना तपासणी करून सभागृहात सोडण्यात आले.

एमपीसी न्यूज- चीनने भारतीय हद्दीत घुसून भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी महापालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली. सभागृह नेते धीरज घाटे यांनी सभा तहकुबी मांडली. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही तहकुबी वाचून सभा तहकूब केली.

दि. 21 जुलै 2020 दुपारी 3 पर्यंत सर्व सभा तहकूब करण्यात आल्या. आज घेण्यात आलेल्या सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांची उपस्थिती कमी होती. नगरसेवक आणि अधिकाऱ्यांना तपासणी करून सभागृहात सोडण्यात आले.

नगरसेवकांच्या नावाचे आसन राखीव ठेवण्यात आले होते. सॅनिटायजर, फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर करून ही सभा काही काळ झाली. कोरोनाचे संकट शहरात गंभीर असल्याने सभेचे कामकाज थांबविण्यात आले.

नगरसेवक आणि अधिकाऱ्यांना तपासणी करून सभागृहात सोडण्यात आले.

यावेळी नगरसेवकांनी सुरुवातीला सही करायला प्राधान्य दिले. मागील 2 महिने अनुपस्थित असल्याने सुमारे 98 नगरसेवकांचे पद धोक्यात आले होते.

दरम्यान, मागील दोन दिवसांपासून कोरोनाच्या संकट काळात काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना- मनसे हे सर्वच विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. भाजपला कोंडीत पकडण्यासाठी खेळी खेळली जात आहे.

मात्र, भाजपनेही विरोधी पक्षांना जशास तसे उत्तर देण्याचे ठरविले आहे. पुणे शहरात कोरोनाचे साडेदहा हजारांहून जास्त रुग्ण झाले आहेत. कोरोनाच्या चाचण्याही वाढविण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.