Pune News : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम न पाळणाऱ्यांची आता खैर नाही

कारवाईसाठी महापालिकेतर्फे पथके स्थापन

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानदारां विरोधात कारवाई करण्यासाठी पुणे महापालिकेतर्फे बुधवारी (दि. 16 सप्टेंबर) पथके स्थापन  करण्यात आली आहेत, तशा प्रकारचे आदेश अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी आज दिले आहेत.

पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी हे पथके तातडीने स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

पुणे शहरातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील जीवनावश्यक सेवा, दुकाने, मार्केट सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन काळात टप्पेनिहाय सुरू करण्यात आलेले आहे. दुकाने आणि मार्केटमध्ये येत असलेले नागरिकांनी मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे, वेळोवेळी परिसर सॅनिटाईज करणे बंधनकारक करण्यात आले आहे. वेळोवेळी बजावण्यात आलेल्या आदेशाचे पालन होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्या पार्श्वभूमीवर धडक कारवाई करण्याचे आदेश या पथकांना देण्यात आले आहे.

क्षेत्रीय स्तरावर अतिक्रमण निरीक्षक, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक आणि आरोग्य निरीक्षक असे एकूण 3 कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले आहेत.

नगररोड – वडगांवशेरी राजेश बनकर सहाय्यक आयुक्त, अनिल डोळे वरिष्ठ आरोग्य निरिक्षक, सचिन गवळी आरोग्य निरीक्षक, सुभाष तळेकर अतिक्रमण निरीक्षक

येरवडा – कळस – धानोरी विजय लांडगे सहाय्यक आयुक्त, संजय घावटे वरीष्ठ आरोग्य निरीक्षक, संदीप पवार आरोग्य निरीक्षक, सुभाष जगताप अतिक्रमण निरीक्षक

ढोले पाटील रोड – दयानंद सोनकांबळे सहाय्यक आयुक्त, सुनील तनवर वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, संदीप रोकडे आरोग्य निरीक्षक, सौरभ बारस्कर सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक

औंध – बाणेर जयदीप पवार सहाय्यक आयुक्त, विजय भोईर वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, राजेंद्र वैराट आरोग्य निरीक्षक, उमेश नरुले अतिक्रमण निरीक्षक

शिवाजीनगर – घोलेरोड आशा राऊत सहाय्यक आयुक्त, सुनील कांबळे वरीष्ठ आरोग्य निरीक्षक, लक्ष्मण चौधरी आरोग्य निरीक्षक, सचिन उतळे अतिक्रमण निरीक्षक

कोथरूड – बावधन संदीप कदम सहाय्यक आयुक्त, राम सोनवणे वरीष्ठ आरोग्य निरीक्षक, शिवाजी गायकवाड आरोग्य निरीक्षक, रवींद्र वाणी सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक

सिंहगड रोड जयश्री काटकर सहाय्यक आयुक्त, आनंद शेंडगे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, संदीप खेराडे आरोग्य निरीक्षक, धम्मानंद गायकवाड अतिक्रमण निरीक्षक

वारजे – कर्वेनगर संतोष वारुळे सहाय्यक आयुक्त, गणेश खिरीड वरीष्ठ आरोग्य निरीक्षक, राहूल शेळके आरोग्य निरीक्षक, अक्षय दाभाडे सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक

धनकवडी – सहकारनगर नीलेश देशमुख सहाय्यक आयुक्त, नरेंद्र भालेराव वरीष्ठ आरोग्य निरीक्षक, एकनाथ माने आरोग्य निरीक्षक, श्रीकृष्ण सोनार अतिक्रमण निरीक्षक

हडपसर – मुंढवा सोमनाथ बनकर सहाय्यक आयुक्त, संजय धनवट वरीष्ठ आरोग्य निरीक्षक, प्रवीण गायकवाड आरोग्य निरीक्षक, तुषार झोंबाडे सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक

कोंढवा – येवलेवाडी तानाजी नरळे सहाय्यक आयुक्त, मंगलदास माने वरीष्ठ आरोग्य निरीक्षक, सुनील गोसावी आरोग्य निरीक्षक अजिंक्य कचरे सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक

वानवडी – रामटेकडी युनूस पठाण सहाय्यक आयुक्त, दिलावर आवटी वरीष्ठ आरोग्य निरीक्षक, प्रदीपकुमार राऊत आरोग्य निरीक्षक, राजशेखर कांबळे सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक

बिबवेवाडी – गणेश सोनुने सहाय्यक आयुक्त, चंद्रकांत लाड वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, राहुल बाठे आरोग्य निरीक्षक, मेघा राऊत अतिक्रमण निरीक्षक

भवानी पेठ – सचिन तामखेडे सहाय्यक आयुक्त, मुक्ततार शाफिर हुद्दीन सय्यद वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, समीर मसूरकर आरोग्य निरीक्षक, राजेश खुडे अतिक्रमण निरीक्षक

कसबा – विश्रामबागवाडा आशिष महाडदळकर सहाय्यक आयुक्त, सुनील मोहिते वरीष्ठ आरोग्य निरीक्षक, नंदकुमार म्हानगरे आरोग्य निरीक्षक, भिमाजी शिंदे अतिक्रमण निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.