Pune : महापालिकेला मिळणार आता 57 एमबीबीएस डॉक्टर; 22 तज्ञ डॉक्टरांच्या पगारात होणार वाढ

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेला आता तब्बल 57 एमबीबीएस डॉक्टर मिळणार असून, सर्वसामान्य पुणेकरांना चांगली आरोग्य सोयीसुविधा उपलब्ध होणार आहे. यापूर्वी 30 ते 35 हजार वेतन असल्याने महापालिकेच्या रुग्णालयात एमबीबीएस डॉक्टरांची कमतरता होती. आता सुधारित वेतनश्रेणीमुळे एमबीबीएस (MBBS) डॉक्टरांची संख्या वाढणार आहे. आता नव्याने या डॉक्टरांना तब्बल 52 हजार रुपये वेतन देण्यात येणार आहे.

पुणे महापालिकेच्या 22 तज्ञ डॉक्टरांना 71 हजार रुपये वेतन वाढविण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकारांना दिली.

महापालिकेच्या रुग्णालयात तब्बल 57 पदे भरण्यास मान्यता घेण्यात आली आहे. हे डॉक्टर पूर्ण वेळ महापालिकेच्या रुग्णालयात सेवा देणार आहेत. तर, पुणे महापालिकेचे तातडीने मेडिकल कॉलेज होण्यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठाकरे यांना पत्र दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like