Pune : वाढीव पाण्यासाठी जलसंपदा नियामक प्राधिकरणासमोर महापालिकेची दाद ; 13 डिसेंबर रोजी पुढील सुनावणी 

एमपीसी न्यूज – महापालिका हद्दीतील लोकसंख्या लक्षात घेता आठ नव्हे तर 15 टीएमसी पाण्याची गरज असल्याची बाजू महापालिकेने राज्य जलसंपदा नियामक प्राधिकरणासमोर मांडली. या मागणीविषयीचे आणखीन तपशील प्राधिकरणाने महापालिकेला मागितले असून, ते दाखल केल्यानंतर 13 डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

महापालिका हद्दीतील लोकांना आणि हद्दीबाहेरील गावांतील लोकांना महापालिकेकडून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र लोकसंख्या विचारात घेता महापालिकेला 15 टीएमसी पाण्याची गरज आहे. या विषयीचे पत्र आणि मागणी वेळेवेळी जलसंपदा विभाग, जलसंपदा मंत्री आणि राज्यसरकारकडे महापालिकेने केली आहे. असे असतानाही शहराला राष्ट्रीय मानांकनाप्रमाणे 8 टीएमसी पाणी पुरेसे असून, त्यातच त्यांनी नियोजन करायचे आहे, असे पत्र जलसंपदा विभागाने दिले होते.
त्या पत्राविरोधात महापालिकेने राज्य जलसंपदा नियामक प्राधिकरणाकडे दाद मागितली होती. त्यावर सोमवारी सुनावणी झाली. यावेळी महापालिकेतील पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी, खडकवासला पाटबंधारे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार आदी अधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.