Pune News : पुणे महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार  : नाना पटोले 

एमपीसी न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका स्वबळावर लढण्याचा निर्णय झाला आहे. त्याच धरतीवर पुणे महापालिकेची निवडणूक सुध्दा स्वबळावरच लढण्यात येणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले.टिळक महाराष्ट्र विद्यापीठात एका कार्यक्रमासाठी ते आले होते.

यानंतर त्यांनी पत्रकारांनी बोलताना, शहरातील भाजपच्या कारभारवर जोरदार टिकास्त्र सोडले. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका स्वबळावर लढण्यात येतील. पुण्यात भाजपची सत्ता आहे. महापालिकेच्या कारभारात मोठ्याप्रमणात गैरव्यवहार होत आहे.

स्मार्ट सिटीसाठी केंद्राकडून आलेल्या पैशाचे काय झाले. कोणते प्रकल्प उभे राहिले. स्मार्ट सिटीच्या नावाने पैशांची लूट झाली आहे. भाजप हा सत्तेचा वापर करुन गैरव्यवहार करत आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणूकांमध्ये पुण्यातील नागरिक काँग्रेसला निश्चितच पसंती देतील असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला आहे.

 

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.