Pune : महापालिकेच्या 7 हजार 390 कोटींच्या अर्थसंकल्प अंमलबजावणीसाठी प्रयत्न करणार -हेमंत रासने

एमपीसी न्यूज – स्थायी समिती अध्यक्ष पदावर काम करण्याची माझ्या पक्षाने मला दुसऱ्यांदा संधी दिली. आगामी काळात 7 हजार 390 कोटींच्या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.

पुणे महापालिकेच्या जुन्या सभागृहात शुक्रवारी हेमंत रासने यांची बहुमताने निवड करण्यात आली. त्यानंतर ते बोलत होते. केंद्रात भाजपचे सरकार आहे. तर, राज्यात शिवसेना – राष्ट्रवादी – काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार आहे.

या काळात विकासकामे करताना खासदार गिरीश बापट, राज्यसभेचे खासदार संजय काकडे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून पुणे शहराचा विकास करणार असल्याचेही हेमंत रासने म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.