Pune : महापालिकेच्या विकासकामांना 30 मे पर्यंत मुदतवाढ : हेमंत रासने

एमपीसी न्यूज – कोरोनाचा फटका पुणे महापालिकेच्या विकासकामांनाही बसला आहे. शहरातील अनेक विकासकामे ठप्प आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मे पर्यंत लोकडाऊन जाहीर केला आहे. त्या पार्श्वभूमीवर स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनीही पुणे शहरातील विकासकामांना 30 मे पर्यंत मुदतवाढ देण्याचे आदेश दिले आहेत. 

पुणे महापालिकेच्या ज्या विकासकामांच्या निविदांनाना 25 मार्चपर्यंतचे आदेश देण्यात आले आहेत.  अशा विकासकामांना 30 मे पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय महापालिकेच्या स्थायी समितिच्या बैठकीत घेण्यात आला आहे. पुण्यात कोरोनाचे रुग्ण   वाढत  आहे. देशभरात 24 मार्चपासून लॉकडाऊन जाहीर केला आहे.  त्याची मुदत ३ मेपर्यंत वाढविण्यात आली आहे. महापालिकेने 25 मार्चपर्यंत आदेश दिलेली विकासकामे अद्याप होऊ शकली नाही. या कामांना 30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

दरम्यानच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनमध्ये   3 मे पर्यंत वाढ  केली.  त्यामुळे विकासकामांना दिलेल्या मुदतवाढीचा उपयोग झाला नाही. त्यामुळे पुन्हा 30 मे पर्यंत महापालिकेच्या विकासकामांना मुदतवाढ देण्यात आली आहे.

दरम्यान, पुणे शहरात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने आणखी लॉकडाऊन  आवश्यक असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे. कोरोनाचा परिणाम महापालिकेच्या उत्पन्नावरही झाला आहे. मिळकत कर कमी झाला आहे. ‘जीएसटी’चे अनुदानही कमी आले. त्यामुळे आगामी काळात शहरातील विकासकामे आणखी किती दिवस ठप्प राहणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.