Pune : महापालिकेच्या नऊ दवाखान्यामध्ये ‘नेत्रसेवा’

एमपीसी न्यूज – पुणे महापालिका आणि ससून सर्वोपचार रुग्णालय यांच्या वतीने महापालिकेच्या नऊ दवाखान्यांमध्ये नेत्रसेवा उपलब्ध करून देण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. आगामी पाच वर्षासाठी ही सेवा देण्यात येणार असून, त्या बाबतचा करार केला जाणार आहे. 

शहरातील जास्तीत जास्त नागरिकांना नेत्रसेवेचा लाभ मिळण्यासाठी पुणे महापालिकेच्या नऊ दवाखान्यांमध्ये पुढील पाच वर्षाकरता बी. जे. मेडिकल कॉलेज, ससून सर्वोपचार रुग्णालय येथील नेत्रतज्ज्ञांमार्फत रुग्णांची नेत्रतपासणी करण्यात येणार आहे. ज्या रुग्णांना नेत्रशस्त्रक्रियेची आवश्यकता आहे. अशा रुग्णांची ससून सर्वोपचार रुग्णालय येथे मोफत नेत्रशस्त्रक्रिया करण्यात येणार आहे, अशी माहिती स्थायी अध्यक्ष योगेश मुळीक यांनी दिली.

दहावी विद्यार्थ्यांच्या खासगी क्लाससाठी पाच हजारांचे अनुदान पालिकेच्या समाजविकास विभागामार्फत इयत्ता दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी खासगी क्लाससाठी देण्यात येणा-या शुल्कासाठीचे अनुदान दोन हजार रुपयांहून पाच हजार रुपये करण्यास मान्यता देण्यात आली. याबाबत समाजविकास विभागाने शिफारस केली होती. हे अनुदान मिळविण्यासाठी कुटुंबाचे पुणे मनपा हद्दीत किमान तीन वर्षे वास्तव्य असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे वय 15 ते 45 वयोगटातील असून, कुटुंबाचे सर्व मार्गानी मिळविलेले उत्पन्न एक लाख रुपयाच्या आत असावे. झोपडपट्टीतील अर्जदारांनी शेजार समूह गटाचा उत्पन्नाचा दाखला जोडावा अन्य ठिकाणी राहत असणाच्या अर्जदारांनी तहसीलदारांचा दाखला जोडणे आवश्यक आहे. मागासवर्गीयांसाठीचा जातीचा व आवश्यकतेनुसार अपंगत्वाचा दाखला जोडणे आवश्यक आहे.

अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती व जमातींतील विद्यार्थ्यांना हे अनुदान मिळणार असून, नववीच्या परीक्षेत किमान ५० टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. मेहतर समाजातील विद्यार्थ्यासाठी शेकडा 45 टवके गुण मिळणे आवश्यक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.