Pune : खेळाडूंना पालिकेच्या नोकरीत आरक्षण 

एमपीसी न्यूज – शहरातील राज्य, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धेत शहराचा लौकिक वाढविणाऱ्या खेळाडूंना महापालिकेच्या नोकऱ्यांमध्ये पाच टक्के आरक्षण, खेळाडूंना शिष्यवृत्ती, विमा,  क्रीडा स्पर्धांच्या तयारीसाठी आर्थिक मदत अशा प्रकारच्या सवलती महापालिकेकडून दिल्या जाणार आहेत.

पालिकेच्या सुधारित क्रीडा धोरणात सुचवण्यात आल्या असून हे धोरण स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आले आहे . महापालिकेकडून 2013 मध्ये क्रीडा धोरण तयार करण्यात आले आहे. मात्र, या धोरणात काही त्रुटी असल्याने विद्यमान क्रीडा समितीने या धोरणात काही बदल करण्याचा निर्णय घेतला होता.

त्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून क्रीडा समितीकडून या धोरणाच्या सुधारित तरतुदी बाबत चर्चा सुरू होती. त्यानंतर अखेर खेळाडूंसाठी मदतीच्या भरघोस तरतुदी करून हे धोरण मान्यतेसाठी स्थायी समितीसमोर ठेवण्यात आले आहे.

या आहेत सुधारित धोरणातील तरतुदी 

राज्यस्तरीय खेळाडूंना पालिका नोकरीत पाच टक्के आरक्षण

राज्य व क्रीडा स्तरावरील खेळाडूंना शिष्यवृत्ती

क्रीडा स्पर्धेच्या तयारीसाठी खेळाडूंना आर्थिक मदत

साहसी खेळांची तयारी करणाऱ्यांना आर्थिक मदत

खेळाडूंसाठी शहरात क्रीडा अकादमी

खेळाडूंना एक लाखाचा विमा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.