Pune : महापालिकेचे कर्मचारी काहीही करीत नाही, येतात आणि हप्ते घेऊन जातात -डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा घरचा आहेर

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेला उत्पन्न वाढविण्यासाठी अनेक पर्याय आहेत. पण, महापालिका कर्मचारी काहीही करीत नाही, येतात आणि हप्ते घेऊन जातात, अशा शब्दांत माजी उपमहापौर, नगरसेवक डॉ. सिध्दार्थ धेंडे यांनी घरचा आहेर दिला.

पुणे महापालिकेत आरपीआय (आठवले गट) भाजपचा सहकारी पक्ष आहे. तसेच, दिल्लीत आपचे सरकार आल्याबद्दल अभिनंदन केले. या सरकारने मिळकत करामध्ये सुसूत्रता आणून प्रयत्न केले. तसेच प्रयत्न पुणे महापालिकेने करण्याचे आवाहन डॉ. धेंडे यांनी केले. दरवर्षी आपले इन्स्पेक्टर टॅक्स लावण्यासाठी पैसे घेतात, सत्ताधारी असलो तरीही हे वास्तव मांडत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

पुणे शहरात 10.50 लाख मिळकती असून, 40 लाख लोकसंख्या आहे. त्याप्रमाणात टॅक्स कलेक्शनसाठी माणसे नाहीत. प्रशासन ठरवते ते पूर्ण करीत नाही. माझ्या प्रभागात 17 झोपडपट्टी आहेत. शहरात 1 लाख 20 हजार झोपडपट्टी धारक आहेत. स्मार्ट कार्ड धारक आहेत. माझ्या प्रभागात162 प्रोफेशनल आहेत. पण, त्यांच्याकडून कलेक्शन शून्य आहे. झोपडपट्टीतील 22 हजार व्यवसायिकाकडून 22 कोटी उत्पन्न मिळेल. दुबार टॅक्स प्रॉपर्टी, ओपन प्लॉट, जुने वाडे आजही टॅक्स नाही. या खात्याला बांधकाम विभाग जोडायला पाहिजे. शहरात दरवर्षी 5 लाख स्केअर मीटर परवानगी देतो.

रेसेडेन्सीयल ते कमर्शियल यायला पाहिजे. होल्डिंग, आयटी मोठ्या प्रमाणात आले. ते 25 टक्के भाड्यावर राहतात. महाराष्ट्र हौसिंग सोसायटी, ओपन प्लॉट, रेड झोन जागा, कमर्शियल ऍक्टिव्हिटी, मंगल कार्यालय, याची नोंदणी किती आहे?. ओपन प्लॉट अनेक ठिकाणी असून त्यावर पार्किंग होत आहे. घोरपडी भागात पार्किंग होत आहे. हॉटेल साईड मर्जिंग, फ्रंट मार्जिनवर जागेचा वापर होतो. त्यावर महसूल वाढविता येते. पण, कर्मचारी हप्ते घेऊन जाण्याशिवाय दुसरे कामच करीत नसल्याची टीका डॉ. धेंडे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.