Pune : महापालिका कर्मचाऱ्यांना श्री शिवसाम्राज्य प्रतिष्ठान ट्रस्टतर्फे दिवाळी फराळ

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी श्री शिवसाम्राज्य प्रतिष्ठान ट्रस्टतर्फे नुकताच दिवाळी फराळ कार्यक्रम आयोजित केला होता. आरोग्य, ड्रेनेज, पाणीपुरवठा, विद्युत, टॅक्स, रोड, उद्यान, भवन आशा विविध विभागातील कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते.

तुम्ही सर्व कर्मचारी वर्षभर रात्रंदिवस जनतेची सेवा करीत असतात. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच आम्ही लोकप्रतिनिधी जनतेचे प्रश्न त्वरित सोडत असतो, असे शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार म्हणाले.

_MPC_DIR_MPU_II

आपल्या सर्वांच्या वर्षभर केलेल्या सहकार्याची आठवण जपण्यासाठी या कौटुंबिक दिवाळी फराळ कार्यक्रम आयोजित केल्याचे यावेळी सांगण्यात आले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धर्मराज सुतार, सुधीर वरघडे, गजानन सातपुते, सुमित माथवड, हेमंत मोहोळ, जितेंद्र खुंटे, अनिल भगत, महेश चव्हाण, योगेश चौधरी, संजय घारमाळकर, रमेश अवधूत, नचिकेत घुमटकार, प्रशांत पाटील, अभिजित चव्हाण, सचिन डाळिंबकर, आप्पा वाघ, योगेश क्षीरसागर, निलेश मिस्त्री, भूषण माथवड, राकेश पानवकर, राकेश क्षत्रीय यांनी प्रयत्न केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.