Pune : महापालिकेच्या डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात आता अतिदक्षता विभाग

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात आता अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला असून तातडीने चार बेड्स उपलब्ध होत आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. ससून रुग्णालयाच्या सहकाऱ्यातून महापालिकेने हा विभाग सुरू केला आहे.

नायडू सांसर्गिक रुग्णालयात अतिदक्षता विभागात लवकरच सुरू करणार अशी घोषणा महापौर मोहोळ यांनी गेल्याच आठवड्यात केली होती. त्यावर तातडीने पावले उचलत अतिदक्षता विभागाचे चार बेड्स सुरू करण्यात येत आहेत. सांसर्गिक रोगांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांना यामुळे मोठा दिलासा मिळाला असून यामुळे खासगी रुग्णालयात उपचारांसाठी जाण्याची गरज पडणार नाही.

महापौर म्हणाले, ‘नायाडू’त अतिदक्षता विभागाची अत्यंत तातडीची गरज होती. त्याच अनुषंगाने महापौर निधीच्या माध्यमातून यासाठी एक कोटी रुपयांचा निधी दिला जात आहे. तातडीच्या स्वरूपात हा विभाग सुरू व्हावा, यासाठी आम्ही ससून रुग्णालयाची मदत घेतलेली आहे’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.