Pune : महापालिका शाळेच्या खोल्या लग्नसमारंभासाठी देण्यात याव्यात; स्थायी समितीकडे  प्रस्ताव सादर

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या शाळेच्या खोल्या लग्नसमारंभासाठी देण्यात याव्यात, असा प्रस्ताव स्थायी समितीकडे सादर करण्यात आला आहे. शहरातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना लग्न कार्य, साखरपुडा व इतर कार्यासाठी शाळांमधील दोन खोल्या सुट्टीच्या दिवशी उपलब्ध करून द्याव्यात़, असे प्रस्तावात म्हटले आहे.

स्वीकृत सभासद अजित दरेकर आणि अ‍ॅड़. भैय्यासाहेब जाधव यांनी हा प्रस्ताव दिला आहे. शहरात 63 टक्के लोकसंख्या गरीब व मध्यमवर्गीय आहे. त्यांना लग्न कार्यालये व सभागृहे घेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही़. त्यामुळे शाळेतील दोन खोल्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी या नगरसेवकांनी केली आहे़.

तर, यापूर्वी ही सुविधा पुणे महापालिकेकडून देण्यात येत होती़. पण, संबंधित कार्य संपन्न झाल्यावर या खोल्यांची दुरावस्था होत असल्याने ही सुविधा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बंद करण्यात आली होती़.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.