Pune : महापालिका स्थायी समिती अध्यक्षपद निवडणूक; भाजपतर्फे हेमंत रासने तर, महाविकास आघाडीतर्फे अशोक कांबळे यांचा अर्ज दाखल

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी भाजपतर्फे ज्येष्ठ नगरसेवक हेमंत रासने यांनी तर, राष्ट्रवादी-काँगेस-शिवसेना महाविकास आघाडीतर्फे नगरसेवक अशोक कांबळे यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.

या समितीत भाजपचे 10 सदस्य असल्याने रासने यांचा विजय निश्चित मानला जात आहे. तर, राष्ट्रवादी 4, काँग्रेस एक आणि शिवसेनेचा एक, असे विरोधी पक्षांचे 6 सदस्य आहेत. या समितीत एकूण 16 सदस्य आहेत. कंबळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करते वेळी आमदार चेतन तुपे, विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, नगरसेवक महेंद्र पठारे, नगरसेवक गणेश ढोरे, काँगेसचा नगरसेविका वैशाली मराठे, शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे उपस्थित होते.

तर, रासने यांचा उमेदवारी अर्ज दाखल करते वेळी महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, आमदार सुनील कंबळे, नगरसेवक धिरज घाटे, राजेंद्र शिळीमकर, दीपक पोटे, राजेश एनपुरे, नगरसेविका गायत्री खडके, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी उपस्थित होते. यावेळी रासने यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.