Pune : महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्ष पदासाठी उद्या निवडणूक होणार; हेमंत रासने यांची निवड निश्चित

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्ष पदासाठी शुक्रवारी (13 डिसेंबर) सकाळी 11.30 वाजता निवडणूक होणार आहे. महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ही निवडणूक होणार आहे.

अध्यक्ष पदासाठी भाजपतर्फे ज्येष्ठ नगरसेवक हेमंत रासने यांनी तर, राष्ट्रवादी-काँगेस-शिवसेना महाविकास आघाडीतर्फे नगरसेवक अशोक कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या समितीत भाजपचे 10 सदस्य असल्याने रासने यांचा विजय निश्चित मानला जात आहे. तर, राष्ट्रवादीचे चार, काँग्रेसचे एक आणि शिवसेनेचा एक, असे विरोधी पक्षांचे 6 सदस्य आहेत.

या समितीत एकूण 16 सदस्य आहेत. भाजपचाच स्थायी समिती अध्यक्ष होणार असल्याने हेमंत रासने यांच्या निवडीचा विजयोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.