Pune : कोरोनाच्या संकट काळात महापालिकेला 300 डॉक्टरांची गरज

The municipality needs 300 doctors during the Corona crisis

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने महापालिकेला 300 डॉक्टर व तेवढ्याच परिचारिका द्याव्यात, अशी मागणी महापालिकेतर्फे राज्य शासनाकडे करण्यात आली आहे.

शहरात रोज कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने महापालिकेतर्फे बालेवाडीमध्ये 1 हजार खाटांचे रूग्णालय तयार करण्यात आले आहे. शासनातर्फे डॉक्टर व परिचारिका आल्यानंतर बालेवाडीत कोरोना रुग्णांसाठी रुग्णालय सुरू करता येणार आहे.

पुण्यात सध्या कोरोनाच्या मोठ्या प्रमाणात चाचण्या करण्यात येत आहेत. त्यामुळे रोज सरासरी 200 रुग्ण वाढतआहेत. सध्या 7 हजार बेड्स सज्ज आहेत. शहरात केवळ 2 हजार 190 रुग्ण कोरोनाचे उपचार घेत आहेत.

महापालिका प्रशासनातर्फे मे अखेरीस 5 हजार कोरोना रुग्ण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यामध्ये आता वाढ झाली आहे.

सध्या कोरोनाबाधितांची संख्या साडे पाच हजारांवर गेली आहे. आणखी 4 दिवसांनी त्यामध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पुणे शहरात बुधवारी कोरोनाचे 5 हजार 533 कोरोनाचे रुग्ण आढळले.

आजपर्यंत शहरातील रुग्णांलयांमधून एकूण 3 हजार 59 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यातील ऍक्टिव्ह रूग्णसंख्या 2 हजार 190 आहे. कोरोनाच्या 1 हजार 360 चाचण्या करण्यात आल्या.

कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असले तरी या आजारातून बरे होणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. आतापर्यंत या रोगामुळे पुणे शहरात 284 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.