Pune : महापालिका 68 ठिकाणी भाजीपाला उपलब्ध करून देणार; पुणेकरांची गैरसोय टळणार

एमपीसी न्यूज – ‘कोरोना’चे रुग्ण पुणे शहरात मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. पुणेकरांची गैरसोय होऊ नये म्हणून पुणे महापालिकेतर्फे 68 ठिकाणी भाजीपाला विकत घेता येतील अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तेथून भाजीपाला खरेदी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यामुळे नागरिकांना घराजवळ भाजीपाला खरेदी करता येणार आहे, असे महापौर मुरलीधर मोहोळ आणि महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले. तसेच, शेतकऱ्यांकडून घरपोच भाजीपाला खरेदी करता येणार आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरूच राहणार आहेत. त्यामुळे पुणेकरांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.

… येथून खरेदी करा भाजीपाला
धानोरी गोल बिल्डिंग शेजारी, औंध गाव भाजी मंडई, बालेवाडी गाव पाण्याच्या टाकीजवळ, पीएमसी इमारतीजवळ औंध, गणेश पेठ भाजी मंडई, महात्मा फुले मंडई, शांताई भाजी मंडई कोंढवा खुर्द, जित मैदान कोथरूड, कॅनॉल रोड वारजे, तुळशीबागवाले कॉलनी सहकारनगर, गंगाधाम चौक बिबवेवाडी, एसआरपीएफ मैदान वानवडी, भुजबळ बंगला कर्वेनगर, कात्रज डेअरी ग्राउंड, बायोगॅस शेजारील मोकळी जागा शिवाजीनगर अशा सुमारे 68 ठिकाणी भाजीपाला खरेदी करता येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.