Pune : मुरलीअण्णा, मेधाताई तुमचा लवकरच सत्कार होईल -चंद्रकांत पाटील; कोथरूडला भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहात

एमपीसी न्यूज – कोथरूड मतदारसंघातून प्रमुख इच्छुक असलेल्या मुरलीधर मोहोळ आणि विद्यमान आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांचा लवकरच सत्कार होईल, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. पाटील यांना कोथरूड मतदारसंघात भाजपने उमेदवारी जाहीर केली. त्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी कार्यकर्त्यांचा मेळावा आशिष गार्डन कोथरूड येथे आयोजित केला होता.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी मला कोथरूड मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा आदेश दिला. त्यानुसार मी निवडणूक लढवीत आहे. मला हरणे माहीत नाही. सर्वजण काम करणार असल्याचे या नेते मंडळींनी भाषणातून सांगितले.

युती संदर्भात बोलताना पाटील म्हणाले, युती होऊ नये यासाठी काहीजणांनी देव पाण्यात ठेवले होते. युतीतील भांडणे ही कुटुंबातील आहे. त्यामध्ये कधी भांड्याला भांड लागते, अशी आठवणही त्यांनी सांगितली.

_MPC_DIR_MPU_II

कोथरूड मतदारसंघात, सोसायटीमध्ये व्यक्तिगत भेटीगाठी देण्यावर भर देणार आहे. राज्यात 220 नव्हे तर 250 आमदार निवडून येणार असल्याचा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

प्रा. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, खंजीर खुपसला तरी चालेल, पण माझा कंठ भारतीय जनता पक्षाच विजयच म्हणेन . 5 हजार पूरग्रस्त यांचे प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी सोडवला. 288 मतदारसंघापैकी त्यांनी निवड केली. 1 ही नगरसेवक निवडून आला नव्हता. मी या मतदारसंघात नात जोडले. मी प्रत्येक सोसायटी, घराघरांत जाईल. जात म्हणून काम करण्याची आवश्यकता नाही. माझी मुलं तान्ही होती. अभ्यासात लक्ष घातले नाही, असे सांगून कुलकर्णी भावुक झाल्या. खंजीर खुपसला तरी चालेल, पण भारतीय जनता पक्षाचा विजयच असो, कोणत्या संघटना काहीही म्हणेन.

संजय काकडे म्हणाले, चंद्रकांत पाटील यांचा उमेदवारीचा मला आनंद आहे. त्यांच्याकडून पुणे जिल्यातील नागरिकांकडून खूप अपेक्षा आहेत. लोकसभेपेक्षा 1 लाख 15 हजारांचा लीड देऊन निवडून आणू.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.