Pune Murder News :घरगुती भांडणातून पत्नीचा खून, हडपसर परिसरातील घटना

एमपीसीन्यूज : पुण्याचा हडपसर परिसरातून एक खुनाचा प्रकार उघडकीस आला. घरगुती भांडणातून पतीने पत्नीच्या डोक्यात तवा मारून खून केला आहे. आज, गुरुवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. माहिती मिळाल्यानंतर हडपसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

कला आदिनारायण यादव ( वय 30) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. हडपसर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

_MPC_DIR_MPU_II

प्राथमिक माहितीनुसार यादव दांपत्य पुण्याच्या केशव नगर परिसरात भाड्याच्या घरात राहत होते. मिळेल ते काम करून ते आपली उपजिविका करत होते. किरकोळ कारणावरून त्यांच्यात रोज वाद होत असत.

आज सकाळी त्यांच्यात नेहमीप्रमाणे भांडण झाले. त्यानंतर आदिनारायण यांनी रागाच्या भरात पत्नीच्या डोक्यात चुलीवरचा लोखंडी तवा घातला. तव्याचा घाव वर्मी बसल्याने कला यादव यांचा मृत्यू झाला.

खून झाल्यानंतरही आरोपी घरातच बसून होता. परंतु, शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर हडपसर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.