Pune : बिबवेवाडीत बिगारी कामगाराचा खून

Murder of a worker in Bibwewadi

एमपीसीन्यूज : तिघा जणांनी मिळून डोक्यात आणि मानेवर पाईपने मारहाण करुन एका बिगारी काम करणाऱ्या इसमाचा खून केल्याची धक्कादायक घटना बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंगाधाम चौकात घडली. आज, शनिवारी दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली.

प्रकाश खाजाप्पा काणेकर ( वय -34) असे खून झालेल्या बिगारी कामगाराचे नाव आहे. आज दुपारी चारच्या सुमारास तिघा जणांनी काणेकर यांना गंगाधाम चौकात अडविले.

त्यानंतर त्यांच्या डोक्यात आणि मानेवर पाईपने मारहाण केली. त्यात काणेकर यांच्या मृत्यू झाला. या खुनाचे कारण समजू शकले नाही.

दरम्यान, काणेकर यांचा खून करणाऱ्या आरोपींची नावे समजली असून, त्यांच्या अटकेसाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे. याबाबत बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.