Pune : अनैतिक संबंधातून पतीचा खून; पत्नी आणि प्रियकर गजाआड

Murder of husband through immoral relationship; Wife and boyfriend arrested : आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी

एमपीसीन्यूज : अनैतिक संबंधात आडकाठी ठरणार्‍या पतीचा पत्नी आणि तिच्या प्रियकराने खून केला.  दहा दिवसापूर्वी साप चावल्या मुळे मृत्यू झाल्याचे भासवून आरोपींनी त्याचे अंत्यसंस्कार ही उरकले होते. मात्र,   पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी खून केल्याची कबुली दिली. या दोन्ही आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

रूपाली कामा मदने आणि प्रियकर दादा कामा महानवर, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांनी अनैतिक संबंधात आडकाठी ठरणाऱ्या रुपालीचा पती रामा कामा मदने यांचा खून केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मदने दांपत्य बारामती तालुक्यातील एका शेतात राहत होते. आरोपी रूपाली हिचे दादा कामावर याच्यासोबत अनैतिक संबंध होते. परंतु, रामा हा या दोघांमध्ये आडकाठी ठरत असल्यामुळे दोघांनी मिळून त्याचा काटा काढण्याचे ठरवले.

त्यानुसार दोघांनी मिळून रामा यांचे तोंड दाबून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याचा खून केला. तसेच साप चावल्यामुळे मृत्यू झाल्याचे भासवून रामा यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारही केले होते.

दरम्यान, पोलिसांना संशय आल्यानंतर त्यांनी या दोघा आरोपींना ताब्यात घेतले आणि त्यांची कसून चौकशी केली. चौकशीत त्यांनी एकत्र करून खून केल्याची कबुली दिली.

या दोघांनाही अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like