Pune : दारू पिण्याच्या कारणावरून तरुणाचा निर्घृणपणे खून; आरोपीला अटक

एमपीसी न्यूज – दारू पिण्याच्या कारणावरून एका तरुणाचा निर्घृणपणे खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना गुरुवारी (दि.18) रात्री साडेदहाच्या सुमारास हिल टॉप देशी दारूच्या दुकानात घडली.

रफीक इस्माईल शेख (वय 37,रा.रामटेकडी, हडपसर) असे खून करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दीपक अभिमान महाजन (वय 33,रा.कॅम्प) याला अटक केली आहे. याप्रकरणी अदिल शेख (वय 20,रा. कॅम्प) याने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अदिल याचा चुलत भाऊ रफीक याचे दीपक महाजन याच्याशी दारू पिण्याच्या कारणावरून कॅम्प येथील देशी दारूच्या दुकानात वाद झाला. या वादातून दीपक महाजन याने इस्माईलला लाथा बुक्क्यांनी जबरदस्त मारहाण करून त्याचा खून केला.

याप्रकरणी पोलिसांनी दीपक ला अटक केली असून पुढील तपास लष्कर पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.