Pune : पूर्ववैमनस्यातून एकाचा डोक्यात वार करून निर्घृण खून

एमपीसी न्यूज – पूर्ववैमनस्यातून एकाचा डोक्यात वार कठीण हत्याराने वार निर्घृण खून करण्यात आला. ही घटना आज बुधवारी (दि.16) पहाटे पावणे दोनच्या सुमारास फुरसुंगी येथील फडतरे वस्ती जवळील रेल्वेलाईन जवळ मजूर कॅम्पमध्ये घडली.

मगलसिंग माहुसिंग (रा.दिंडोरी, मध्यप्रदेश) असे यातील आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मोहिंदर राजाराम वाघोदे (वय 46, रा.तरवडे वस्ती,हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. संपतसिंग मणिकलाल (वय 52, रा.दिंडोरी, मध्यप्रदेश) असे खून करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुरसुंगी येथील फडतरे वस्तीजवळील रेल्वे लाईनजवळ मजूर कॅम्प येथे रात्री पावणेदोनच्या सुमारास आरोपी मंगलसिंग याने संपतसिंग याच्यासोबत पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून त्याच्या डोक्यात कठीण हत्याराने वार केले. यामध्ये संपतसिंग हा गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. आरोपी फरार असून याप्रकरणी मंगलसिंग याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा शोध हडपसर पोलीस घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.