Pune : चोरट्याना विरोध करताना ट्रकचालकाचा धारदार शस्त्राने खून

एमपीसी न्यूज – ट्रकची बॅटरी चोरताना विरोध केला म्हणून चोरटयांनी ट्रकचालकाची धारदार शस्त्राने हत्या केली. ही घटना आज पहाटे अडीचच्या सुमारास मांजरी येथील द्राक्ष संशोधन केंद्राजवळ घडली.

दत्तात्रय गंगाधर भोईटे (वय 40) असे मृत ट्रकचालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकचालक दत्तात्रय हे सोलापूरला जात असताना झोप आली म्हणून त्यांनी रस्त्याच्या बाजूला आपला ट्रक उभा करून ते झोपी गेले. त्यावेळी ट्रकची बॅटरी चोरण्यासाठी तिथे चोरटे आले. चोरट्यानी एक बॅटरी काढली व दुसरी बॅटरी काढताना भोईटे यांना जाग आली. त्यांनी त्या चोरट्यांना विरोध करताना झालेल्या झटपटीत एका चोरट्याने त्यांच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केला. व त्यामध्ये दत्तात्रय गंभीररीत्या जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.