Pune : पुणे महापालिकेसमोर नग्नावस्थेत सापडला तरुणाचा मृतदेह

एमपीसी न्यूज- पुणे महापालिकेसमोर नग्नावस्थेत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. या तरुणावर धारदार शस्त्राने वार करून खून कऱण्यात आला.  गुरुवारी (दि.17) रात्री ही घटना घडली.

सुजन मंडल (वय 30) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेच्या नवीन इमारतीसमोर असलेल्या पादचारी पुलावर एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संबंधित व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

प्राथमिक माहितीनुसार मृत तरुण पश्चिम बंगालचा रहिवाशी आहे. त्याच्या डोक्यावर धारदार शस्त्राचे वार करण्यात आले असून मृतदेह नग्नावस्थेत आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.