Pune : पुण्यात खुनाचे सत्र सुरूच; चोरी केल्याच्या संशयावरून दोघांनी केला भर रस्त्यात महिलेचा खून

एमपीसी न्यूज : पुण्यात खुनाचे सत्र सुरूच (Pune) असून आज सलग चौथ्या दिवशी भर रस्त्यात एका महिलेची हत्या करण्यात आली. दहा-बारा दिवसाआधी हरवलेल्या मोबाईलच्या संशयावरून दोन आरोपीनी महिलेला मारहाण केली त्यात महिलेचा मृत्यू झाला. ही घटना फरासखाना पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली असल्याचे पोलिस उपायुक्त संदीप गिल यांनी सांगितले. 

यामध्ये वर्षा थोरात या महिलेचा खून झाला असून अब्दुल सय्यद आणि गौरव चौगुले या आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थोरात ही फिरस्ता असून तिला दारुचे व्यसन होते. अब्दुल सय्यद हा अंडा भूर्जीचा व्यवसाय करतो. दहा – पंधरा दिवसांपूर्वी अब्दुल याचा मोबाईल चोरीला गेला होता़, हा मोबाईल थोरातने चोरल्याचे कोणीतरी त्याला  माहिती दिली. त्याने या संशयावरून थोरात बाईकडे मोबाईल बाबत विचारणा केली. त्यावरुन त्यांच्यात वादावादी झाली. तेव्हा त्यांनी वर्षा हिच्या डोक्यात काठीने मारहाण केली. घाव डोक्यात बसल्याने थोरात खाली कोसळली.

काठीच्या वाराने वर्षाचा रक्तस्त्राव जास्त झाल्याने तिचा (Pune) रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. फरासखाना पोलिसांना घटनेची माहिती मिळताच धाव घेऊन दोन जणांना अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.