Pune : पुण्यात रविवारी गायन, वादन, नर्तनाचा ‘ कॅलिडोस्कोप ‘

नृत्याच्या वैविध्यपूर्ण आविष्काराचे आयोजन

एमपीसी न्यूज- संगीत, नृत्याच्या वैविध्यपूर्ण आविष्काराचे आयोजन ‘ कॅलिडोस्कोप ‘ या नावाने करण्यात आले असून गायन, वादन, नृत्याची ही मैफल उद्या रविवारी (दि. 13) पुण्यात गरवारे महाविद्यालय येथे सायंकाळी साडेसहा वाजता आयोजित करण्यात आली आहे.

पं. रामदास पळसुले ( तबला ), अमर ओक ( बासरी ), प्रथमेश लघाटे ( गायन ), हर्षला वैद्य (कथक), रोहन वनगे (वेस्टर्न ऱ्हीदम), निषाद वैद्य (सिंथेसायझर) यांचा या सांगितिक मैफिलीत समावेश आहे. उपशास्त्रीय संगीत, लोकसंगीत, सुफी संगीत, गझल,सीने संगीत असे वैविध्यपूर्ण आविष्कार ‘ कॅलिडोस्कोप ‘ मधून अनुभवता येणार आहेत. अरूणा अनगळ सूत्रसंचालन करणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.