Pune : सूर-तालातून उलगडला चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ

एमपीसी न्यूज – ‘जाने क्यु लोग मोहब्बत किया करते है’, ‘कस्मे वादे प्यार वफा सब’, ‘ख्वाब हो तुम या कोई हसी हो’, ‘मेरे सपनो कि रानी कब आएगी तु’ अशा हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये एव्हरग्रीन ठरलेल्या गाण्यांचे आपल्या सुमधूर गायनातून सादरीकरण करीत युवा गायक आणि कलाकारांनी रसिकांसमोर संगीताचा सुवर्णकाळ उलगडला.

पुणे नवरात्र महोत्सव समिती, फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फौंडेशनतर्फे आयोजित 25 व्या पुणे नवरात्र महोत्सवात युवा गायक आणि कलाकारांनी सूर पालवी प्रस्तुत सिल्व्हर ज्युबिली या संगीतमय कार्यक्रमातून आपल्या अप्रतिम अदाकारीने कार्यक्रमात रंगत आणली. महोत्सवाचे संयोजक आबा बागूल, जयश्री बागूल, घनःश्याम सावंत, नंदकुमार बानगुडे, नंदकुमार कोंढाळकर, रमेश भंडारी, अमित बागुल, विकी खन्ना यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. किशोर सरपोतदार आणि अजित कुमठेकर यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

अभिषेक मारटकर यांनी कोहिनूर या चित्रपटातील ‘मधुबन मे राधिका नाचे रे’ या गाण्याने कार्यक्रमाची अप्रतिम सुरुवात केली. त्यानंतर सामी सौदागर यांनी ‘कस्मे वादे प्यार वफा सब’ या गाण्यातून मेलडीचा प्रत्यय दिला. पल्लवी पत्की यांनी गायलेल्या ‘जाने क्यू लोग मोहब्बत किया करते है’ या गाण्याने रसिकांना ताल धरायला लावला. अभिषेक मारटकर, समीर सौदागर, पल्लवी पत्की, मकरंद पाटणकर, संतोष गायकवाड, सय्यद राज यांनी गायलेल्या गाण्यांना रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रशिद शेचा (किबोर्ड), मिहिर भडकमकर, (किबोर्ड), अंकुश बोर्डे (ढोलक), विजय मूर्ती (गिटार), महेश रिसवडकर (गिटार), मनोज मोरे (ड्रम), रोहित साने (तबला), संजय हिवराळे (ऑक्टोपॅड) यांनी गायकांना साथउसंगत केली.

महेश अचिंतलावार यांनी कार्यक्रमाचे निावेदन केले. ‘कह दो के तुम हो मेरी वरना’, ‘है अगर दुश्मन’, ‘परदा है परदा’, ‘तुझे देखा तो ये जाना सनम’, ‘सोचेंगे तुम्हे प्यार कर के नही’ या नवीन आणि जुन्या गाण्यांच्या सादरीकरणाने रसिकांना संगीताच्या सुवर्णकाळाची आठवण करुन दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.