Pune : संगीत नृत्य नाटिकेने उलगडला ‘युगनायकाचा’ जीवनप्रवास

एमपीसी न्यूज- नवचैतन्य, ऊर्जा भरणारे संगीत, मोहक नृत्याविष्कार, थेट हृदयचा ठाव घेणारी संवादफेक, खिळवून ठेवणारी प्रकाश योजना अन राष्ट्रभक्तीची लहर पसरवणारा जीवनप्रवास अशा परिपूर्ण संगीत नृत्य महानाट्याचा रोमांचक अनुभव पुणेकरांनी घेतला. निमित्त होते ‘युगनायक विवेकानंद’ या महानाट्याचे.

महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या ‘संस्कृती प्रतिष्ठान’च्या वतीने आयोजित 10 व्या ‘कोथरूड सांस्कृतिक महोत्सवा’च्या तिस-या दिवशी रामकृष्ण मठ, पुणे निर्मित ‘युगनायक विवेकानंद’ या महानाट्याचे सादरीकरण झाले. स्वामी विवेकानंद यांच्या शिकागो धर्म परिषदेतील प्रसिद्ध भाषणाला १२५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. स्वामी श्रीकांतानंद यांनी सदर नाट्याचे लेखन केले असून केदार पंडित यांनी नाट्य व संगीत दिग्दर्शन केले आहे.

यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक व महापौर मुरलीधर मोहोळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर संघचालक रविंद्र वंजारवाडकर, कैलास सोनटक्के, स्थायी समिति अध्यक्ष हेमंत रासने, महापालिक सभागृह नेते धिरज घाटे, भाजप शहर संघटक राजेश पांडे, बढेकर ग्रुप्सचे प्रवीण बढेकर, गोखले कन्स्ट्रक्शन्सचे विशाल गोखले, रावेतकर ग्रुपचे अमोल रावेतकर, कॉसमॉस बँकेचे संचालक सुहास गोखले, सिनर्जी होलीडेजचे गणेश जाधव, राजेंद्र अवटे, गिरिकंद ट्रव्हल्स अखिलेश जोशी, सेट डिझायनार विनायक रासकर, अभिजीत भोसले आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मोहोळ म्हणाले, “पुणे सांस्कृतिक नगरी आहे व कोथरूड पुण्याचे सांस्कृतिक केंद्र. त्यामुळे येथील रहिवास्यांना साहित्य, संगीत, नाटक अशा सगळ्याचाच आस्वाद घेता यावा या हेतूने या महोत्सवाची १० वर्षांपूर्वी सुरुवात झाली. याच हेतूने आज हे महानाट्य महोत्सवात सादर होत आहे.”

“तरुणांना राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम, संस्कृती परंपरेचा आदर म्हणजे काय आणि तो कसा निर्माण होतो हे शिकविले. त्यांच्याच मार्गदर्शनात तेंव्हाचा आणि आताचाही तरुण तयार होत आहे,’ अशी भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर संघचालक रविंद्र वंजारवाडकर यांनी व्यक्त केले.

ब्रिटीशांनी भारतीयांच्या बुद्धीवर वार करत आपला धर्म, संस्कृती, परंपरा यांच्याविषयी न्यूनता आणली. तरुणांना त्यांच्या आधीन केले. हेच धर्म संकट दूर करायला स्वामी विवेकानंद पुढे आलेत. त्यांनी भारतीय तरुणांमध्ये नवी ऊर्जा, राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम भरले. तरुण ऊर्जेचा सकारात्मक मार्ग शिकवला. विज्ञान आणि तत्वज्ञानाची सांगड घालायला शिकवले. अशा या युग पुरुषाचा जीवनप्रवास नाट्य रूपात यावेळी उलगडला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.