Pune : ‘नाचू अभंगाचे रंगी’मधून उलगडणार ज्ञानदेवांचे अभंग आणि जीवनपट

एमपीसी न्यूज- ‘भारतीय विद्या भवन‘ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन‘च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘नाचू अभंगाचे रंगी’ संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या अभंगाचा नृत्यनाट्य अविष्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा ५७ वा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता होणार आहे.

‘कलापिनी’ (तळेगाव दाभाडे) निर्मित आणि ‘सृजन नृत्यालय’ प्रस्तुत हा कार्यक्रम ‘भारतीय विद्या भवन‘चे ‘सरदार महादेव बळवंत नातू सभागृह‘, सेनापती बापट रोड येथे होणार आहे, अशी माहिती ‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी पत्रकाद्वारे दिली.

कार्यक्रमाची संकल्पना लेखन, दिग्दर्शन आणि नृत्यरचना मीनल कुलकर्णी यांचे आहे. संगीत दिग्दर्शन विनायक लिमये यांनी केले असून, नेपथ्य आणि प्रकाशयोजना केदार अभ्यंकर यांची आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.