BNR-HDR-TOP-Mobile

Pune : भारतीय विद्या भवनमध्ये 25 एप्रिल रोजी ‘संगत संगोष्ठी’

कथक नृत्य ,साथसंगत यावर सप्रयोग चर्चासत्र

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘संगत संगोष्ठी’ या कथक नृत्य, साथसंगत या विषयावर ‘संगत संगोष्ठी’या सप्रयोग चर्चासत्रचे आयोजन 25 एप्रिल ​रोजी करण्यात आले आहे.‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली.

शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था आणि नृत्यवेध कथक नृत्य संस्था हा कार्यक्रम सादर करणार आहेत. दि. 25 एप्रिल, शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता ‘भारतीय विद्या भवना’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट ​रस्ता येथे हा कार्यक्रम होणार आहे.

निखिल फाटक, डॉ.चैतन्य कुंटे, सुनील अवचट, चिन्मय कोल्हटकर, मृण्मयी फाटक, आमोद कुलकर्णी, डॉ.माधुरी आपटे हे कलाकार या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत होणारा हा ७४ वा कार्यक्रम असून तो विनामूल्य आहे.

HB_POST_END_FTR-A4

.