Pune : पूरग्रस्तांना स्वयंपाकाच्या भांड्यांचे वाटप

एमपीसी न्यूज- दि मुस्लिम कॉपरेटिव्ह बँक लि. व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या वतीने ७१५ पूरग्रस्तांना रविवारी स्वयंपाकाच्या भांड्यांचे, संसारोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.

शांतीनगर, कतारवाडी व आदर्श इंदिरानगर (येरवडा )या परिसरातील पूरग्रस्त नागरिकांना संसारोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. पूरग्रस्त नागरिकांना मदत करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

मुस्लिम को-ऑपरेटिव बँकेचे अध्यक्ष डॉ . पी. ए. इनामदार, आमदार जगदीश मुळीक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे,नगरसेविका फरजाना शेख , अॅड. अयुब शेख यांच्या हस्ते वाटप झाले. यावेळी नगरसेविका शीतल सावंत, पुणे शहर आरपीआय अध्यक्ष अशोक शिरोळे, स्वीकृत नगरसेवक संजय कदम, चंद्रकांत जंजिरे, संपर्क प्रमुख आरपीआय अशोक कांबळे, सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश आरपीआय बाळासाहेब जानराव आदी मान्यवर उपस्थित होते.

नगरसेविका फरजाना शेख, बँकेचे संचालक अॅड. अयुब शेख यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.