Pune : मुस्लिम सहकारी बँकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत भारतीय हवाई दलाचे अभिनंदन

एमपीसी न्यूज- दि मुस्लिम सहकारी बँकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत पुलवामा दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्त्युत्तर देणाऱ्या भारतीय हवाई दलाचे अभिनंदन करण्यात आले. अभिनंदनाचा विशेष ठराव मांडण्यात आला. त्याला सभासदांच्या टाळयांच्या गजरात मान्यता देण्यात आली.

अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष डॉ.पी. ए. इनामदार होते. आझम कॅम्पस असेंब्ली हॉल येथे ही सभा झाली. संचालक वर्ग, सभासद , कर्मचारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.