Pune : मुठा उजवा कालवा बाधितांना थेट अनुदानाद्वारे मदत

एमपीसी न्यूज- मुठा उजवा कालवा फुटीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत देण्यासाठी महापालिकेस तब्बल दोन महिन्यांनंतर वेळ मिळाला आहे. त्यानुसार पूर्णतः बाधित 90 कुटुंबांसाठी प्रत्येकी अकरा हजार रुपये आणि अंशतः बाधित 669 कुटुंबांसाठी प्रत्येकी पाच हजार रुपये मदत करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी दिली.

ही रक्‍कम या नागरिकांना थेट त्यांच्या बॅंक खात्यात दिली जाणार आहे. महापालिकेने मंजूर केलेल्या मदतीवर, पूर्णतः बाधितांसाठी नऊ लाख नव्वद हजार रुपये आणि अंशतः बाधितांसाठी तेहतीस लाख पंचेचाळीस हजार रुपयांची मदत करण्यात येणार आहे. एकूण 759 कुटुंबांना 43 लाख पस्तीस हजार रुपये दिले जाणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.