BNR-HDR-TOP-Mobile

Pune : पुण्याचे आणि माझे नाते जवळचे – अभिनेत्री करिष्मा कपूर

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – पुण्याचे आणि माझे नाते खूप जवळचे आहे, असे सांगून अभिनेत्री करिष्मा कपूर म्हणाली मला सगळ्यात जास्त साडी आवडते. निमित्त होते चिंचवडला मान्यवर आणि मोहेने यांच्या शोरुमच्या उदघाटनचे.

‘मान्यवर’ आणि ‘मोहेने’ या वेदांत फॅशन्स प्रा. लि. या भारतातील एथानिक वेअर उत्पादकांच्या एक्स्लुसिव्ह फॅशन ब्रॅंण्डसनी चिंचवडमध्ये १० वे शोरुम सुरु केले. यावेळी हरेश कटारिया आणि मंजु कटारिया उपस्थित होते.

अभिनेत्री करिष्मा येणार अशी चर्चा होती. तसे पोस्टरही लावण्यात आले होते. दुपारी तीन वाजल्यापासून चाहत्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. उत्सुकता शिगेला पोहचली. चिंचवड चौक वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. करिश्माने आपल्या आयुष्याला जास्त प्राधान्य देणार असल्याचे तिने सांगितले. करिश्माचे हावभाव आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली.

HB_POST_END_FTR-A4

.