Pune : उपमुख्यमंत्री करून पक्षाने माझा सन्मानच केला – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज-बाळासाहेबांच्या विचाराचे खरे पाईक कोण होते.तर ते एकनाथ ( Pune ) शिंदे होते आणि ते आपल्या सोबत आले.त्यामुळे आपलं पुन्हा सरकार आले आहे. त्याच बरोबर पदापेक्षा विचार महत्वाचा असतो.पण महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात भगव्याचा विचार पायदळी तुडवला जात होता.भगव्याचा विचार वाचवण्यासाठी मला घरी बसावं लागलं असत तरी चाललं असत.माझा पक्षाने उपमुख्यमंत्री करून सन्मानच केला आहे,अशी भूमिका भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात कार्यकर्ता मेळाव्यात मांडली.

भारतीय जनता पक्षाच्या ‘घर चलो’ या संपर्क अभियानाचा शुभारंभ आणि भाजपा पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.यावेळी आमदार माधुरी मिसाळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

Chikhali : …अन् काही तासासाठी चिखली रोड, साने चौकाने घेतला मोकळा श्वास

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की,राज्यात 2019 ला विधानसभा निवडणुक झाली.त्यावेळी जनतेने भाजप शिवसेना युतीला निवडून दिले आणि त्यावेळी युतीच्या 170 जागा निवडून आल्या.पण उद्धव ठाकरेंनी खुर्चीसाठी विचार सोडला.मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी आपली साथ सोडली आणि महाराष्ट्रात महावसुली सरकार आले.त्या अडीच वर्षाच्या खूप संघर्ष करावा लागला.त्या दरम्यान महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्री आणि त्यांच्या इशाऱ्यावर चालणारे अधिकारी देखील जेलमध्ये गेले.अशा प्रकारे महाविकास आघाडीचा कारभार चालत होता.अशा शब्दात महाविकास आघाडी सरकारवर त्यांनी टीका केली.

Pune : एनडीए युथ स्पोर्टस क्लब, सिटी एफसी पुणे, संगम यंग बॉईज, दुर्गा एस.ए. उपांत्य फेरीत

तसेच ते पुढे म्हणाले की,आज कर्नाटक निवडणुकीतील विजयावर विरोधक आनंदोत्सव साजरा करत आहेत.बेगामी शादी में अब्दुल दिवाना अशी स्थिती झाली आहे.आज विरोधकांनी कितीही आनंदोत्सव साजरा केला तरी आगामी लोकसभा निवडणुकीत कर्नाटकमध्ये 28 पैकी 25 जागांवर भारतीय जनता पक्ष नक्कीच विजय होईल.वास्तविक, विरोधकांनी आत्मचिंतन केले पाहिजे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत अर्धा टक्का ही मतं मिळू शकली नाहीत, असा टोला ही त्यांनी यावेळी लगावला.

तसेच ते पुढे म्हणाले की,करोना काळात महावसुली सरकारने मयताच्या टाळूवरचे लोणी खाण्याच काम केले.पुण्याच्या कोविड सेंटरमध्ये घोटाळा केला. त्या विरोधात शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी संघर्ष केला.आम्ही जन्माला सोन्याचा चमचा घेऊन आलो नसून संघर्ष करणे हाच आमचा डीएनए आहे.अशा शब्दात महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्यांनी ( Pune )सुनावले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.