Pune : उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल नदीम मुजावर यांचा भोलासिंग अरोरा यांच्या हस्ते सत्कार

एमपीसी न्यूज – शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक यांच्या ५५० व्या जयंती निमित्ताने गणेश पेठमधील श्री गुरुसिंग सभा गुरुद्वाराच्या वतीने समाजात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र मुस्लिम फ्रंटचे संस्थापक अध्यक्ष नदीम मुजावर यांचा भोलासिंग अरोरा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मुजावर यांना सन्मानचिन्ह आणि शाल देउन सन्मानित केले.

यावेळी संतोकसिंग राजपाल, राजू अरोरा, राजेंद्रसिंग वालिया, इकबाल तांबोळी, मुस्ताक पटेल, हाजी साहेब, सरताज खान,वसिम शेख मान्यवर उपस्थित
होते. नदीम मुजावर हे महाराष्ट्र मुस्लिम फ्रंटचे संस्थापक अध्यक्ष असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे पश्चिम महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी सर्व धर्मीय बांधवासाठी काम केलॆ असून महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, गरजू लोकांना मदत, युवकांना रोजगार, महिला बचत गटांना मदत त्यांनी केली आहे. या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्याना सन्मानित करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.