Pune : माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या राज्य कार्यकारिणी सदस्यपदी प्रदीप नाईक

एमपीसी न्यूज – माहिती अधिकार कार्यकर्ता (Pune) महासंघाच्या राज्य कार्यकारिणी सदस्यपदी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांची तर प्रचार प्रमुखपदी ललित ससाणे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.

Chinchwad News : पथनाट्य राहिले बाजूला तेथे भरले भांडण नाट्य

ही निवड माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी केली आहे. ही निवड 31 जानेवारीपासून पुढील तीन वर्षापर्यंत कायम राहणार आहे. प्रदीप नाईक हे तळेगाव व आसपाच्या परिसरातील विविध मुद्यांवर प्रकाश टाकतात, त्यांनी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत अनेकांना मदत केली आहे. याबरोबरच ते विद्यार्थी तसेच नागरिकांमध्ये माहिती अधिकार कायदा काय आहे, त्याचा आपण कसा वापर करु शकतो, याबद्दल मार्गदर्शन शिबिर देखील घेतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.