Pune : ‘नमो चषक’ स्पर्धांमुळे विविध क्रीडा प्रकारांना व स्थानिक खेळाडूंना वाव – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – युवा आणि स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी (Pune) नमो चषक ही संकल्पना अत्यंत उपयुक्त ठरत आहे. या माध्यमातून विविध क्रीडा प्रकारांना आणि तो खेळ खेळणाऱ्या सर्वांना आपले खेळातील कौशल्य दाखविण्याची संधी मिळत आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. कोथरूड मतदारसंघात बॉक्स क्रिकेट सह व्हॉलिबॉल, सायकल, मल्लखांब,वॉकेथॉन, स्केटिंग, सह विविध स्पर्धा पार पडल्या आणि अजूनही काही स्पर्धा पुढील पंधरवड्यात पार पडणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

कॅरम स्पर्धा अत्यंत उत्साहात पार पडल्याचे संयोजक आणि भाजपचे पुणे शहर युवा मोर्चाच्या क्रीडा आघाडीचे प्रमुख प्रतीक खर्डेकर यांनी सांगितले. कॅरम स्पर्धाचे उद्घाटन कोथरूड मंडल ( दक्षिण ) अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, कोथरूड उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, कोथरूड मंडल सरचिटणीस आणि महिला मोर्चा प्रभारी मंजुश्री खर्डेकर, माजी नगरसेवक जयंत भावे यांच्या हस्ते पार पडले.

Talegaon : किरकोळ कारणावरून गाडी चालकाला शिवीगाळ करत गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

यावेळी मुख्य अतिथी म्हणून कॅरमचे राष्ट्रीय खेळाडू शिवछत्रपती अवार्ड विजेते अनिल मुंडे आणि भाजपा चे प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर उपस्थित होते. तसेच मंडल सरचिटणीस दीपक पवार,बाळासाहेब धनवे, वैभव जमदाडे, श्रीकांत गावडे, युवा मोर्चा (Pune) अध्यक्ष अमित तोरडमल, महिला मोर्चा उपाध्यक्ष कल्याणी खर्डेकर उपस्थित होते.

दिवसभर रंगलेल्या या स्पर्धेत खुल्या गटात प्रथम क्रमांक किशोर भोंडवे यांनी तर द्वितीय क्रमांक साई डोंगरे आणि तृतीय क्रमांक चरण खुडे यांनी पटकावले. ज्येष्ठ नागरिकांच्या स्पर्धेत राजाभाऊ ठाकूर विजेते, तर पंकज कुलकर्णी उपविजेते ठरले. महिलांच्या गटात शुभदा गोडबोले विजेत्या, तर लता भावे उपविजेत्या ठरल्या.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भाजयुमो क्रीडा आघाडीचे पदाधिकारी अनिश अग्रवाल, चैतन्य इनामदार, ओंकार कुडले, प्रणव वडनेरकर यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रतीक खर्डेकर यांनी संयोजन व सूत्रसंचालन केले. पुढील आठवड्यात शिवकालीन कला स्पर्धा ( लाठी काठी ) तसेच शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित करत असल्याचेही प्रतीक खर्डेकर यांनी जाहीर केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.