Pune : नाना पेठेत तरुणावर कोयत्याने वार, चार जण अटकेत

Nana Peth youth attacked with a scythe, four arrested : पूर्वीच्या वादातून जीवघेणा हल्ला

एमपीसीन्यूज : पूर्वीच्या वादातून एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करणाऱ्या चौघांना समर्थ पोलिसांनी अटक केली. समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नाना पेठेत हा प्रकार घडला.

अक्षय लक्ष्मण शितोळे (वय 24), मुनाफ रियाज पठाण (वय 23), अक्षय दशरथ अकोलकर (वय 28) आणि हितेंद्र विजय यादव (वय 32), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी आकाश सासवडे (वय 20) यांनी फिर्याद दिली आहे.

समर्थ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसापूर्वी आकाश सासवडे याचे दोघांसोबत भांडण झाले होते. याच भांडणाचा रागातून आरोपींनी फिर्यादी यांना बेदम मारहाण केली. यापैकी एकाने त्यांच्यावर कोयत्याने वार केले.

समर्थ पोलिसांनी या चारही आरोपींना अटक केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक शिकलगार करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.