Pune : भारतीय सेनेच्या मागे देशवासी पहाडासारखे उभे- नरेंद्र मोदी

‘मेरा बूथ सबसे मजबूत’ उपक्रमातून नरेंद्र मोदी यांनी साधला देशभरातील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद

एमपीसी न्यूज- भारताची प्रगती रोखून देशात अस्थिरता पसरवण्याचे काम शत्रूराष्ट्राकडून केले जात आहे. मात्र आपण कधीच थांबणार नाही. किंबहुना अधिक वेगाने प्रगतीपथावर मार्गक्रमण करू. सध्या देश एका वेगळ्या परिस्थितीमधून जात आहे. सीमारेषेवर आपले जवान पराक्रम करीत आहेत. अशा वेळी देशात शांतता प्रस्थापित होण्यासाठी सर्वानी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. भारतीय जनता पक्षाने ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ या कार्यक्रमाची आज, गुरुवारपासून सुरुवात केली आहे. यानिमित्त नरेंद्र मोदी यांनी विडिओ कॉन्फेरेंसिंग द्वारे देशभरातील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

यावेळी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात खासदार अनिल शिरोळे, शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्यासह शहरातील भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या तणाव स्थितीवर भाष्य करताना नरेंद्र मोदी म्हणाले, ” आपण सगळे पराक्रमी भारताचे नागरिक आहोत. देशाला सुरक्षा आणि सामर्थ्य देण्याचा संकल्प करुन आपला जवान सीमेवर उभा आहे. आपल्या सर्वाना देशाची समृद्धी आणि सन्मानासाठी दिवस-रात्र एक करावा लागेल. सैन्याच्या सामर्थ्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. त्यांच्या मनोधैर्यावर परिणाम होईल किंवा शत्रूंना आपल्याकडे बोट दाखवण्याची संधी मिळेल असे कोणतेही कृत्य आपल्याकडून होता कामा नये “

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.