Pune : पुण्यनगरी ही ज्ञानवंत, संस्कार, सांस्कृतिक नगरी- पंतप्रधान नरेंद्र मोदी

एमपीसी न्यूज – पुण्यनगरी ही ज्ञानवंत, संस्कार, सांस्कृतिक नगरी आहे. पुण्यनगरी ही महापुरुषांच्या पावलांनी पावन झाली. छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, लोकमान्य टिळक, महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे, राजगुरू,चापेकर बंधू, उमाजी नाईक, वासुदेव बळवंत फडके, एक से बढकर एक की ये पुणे धरती है, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महापुरुषांचे स्मरण केले.

विद्येचे माहेरघर, विद्येचे माहेरघर असलेल्या या पुण्यनगरीत आपण एवढ्या मोठ्या संख्येने आल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी धन्यवाद व्यक्त केले. कसं काय पुणेकर ? म्हणून भाषणाला सुरुवात केली. जेव्हा जेव्हा मी पुण्यात आलो, तेव्हा तेव्हा पुणेकरांनी मला आणि माझ्या दोस्तांना खूप काही दिले. 2014 असो की 2019, लोकसभा असो की, विधानसभा पुण्यात भाजप महायुतीला प्रचंड जनादेश दिला. त्यासाठी आपण पुणेकरांना वारंवार धन्यवाद करीत असल्याचे मोदी म्हणाले.

शहराचे सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, बाबा मिसाळ, गणेश बिडकर, गणेश घोष या सर्वांनी पुणेकरांच्या वतीने भला मोठा हार मोदींना घातला. हा हार म्हणजे विजयाची नांदी असून पुणे जिल्ह्यातून 21 आमदार शिवसेना – भाजपचे निवडून येणार असल्याचा विश्वास माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर यांनी व्यक्त केला. शहराध्यक्ष माधुरी मिसाळ, खासदार गिरीश बापट, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मोदी यांना फेटा घालण्यात आला. आज चतुर्थी असल्याने गणेश मूर्तीही यावेळी देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.